Solapur Babaraje Jagtap Smoking Video : सोलापुरातील कुर्डू गावात महिला IPS अधिकारी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेलं संभाषण अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. आता या दोघांचं संभाषण घडवून आणलेल्या बाबाराजे जगताप याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
‘मैं DCM बोल रहा हूं…मैं तुमपे अॅक्शन लूंगा’
अजित पवार यांनी ‘ताबडतोब कारवाई थांबवा, मैं DCM बोल रहा हूं…मैं तुमपे अॅक्शन लूंगा’, अशा भाषेत बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे प्रकरण राज्यात चर्चेत आल्यानंतर माढा तालुक्याचा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष बाबाराजे जगताप याचा आता एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बाबाराजे जगताप हा राष्ट्रवादीचा कार्यकर्त्याचा नशा करतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. त्यामुळे जगताप याच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी स्वतः शनिवारी कुर्डू गावात जाऊन पत्रकार परिषद घेऊन, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बाजू घेत पाठराखण केली होती. उलट त्या आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून बोलले आवाज कळत नाहीय का? अशा भाषेत त्यांनी टीका केली होती. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संघ लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून चौकशीची मागणी केली होती. त्यांनतर अमोल मिटकरी यांनी दिलगिरी व्यक्त करत बिनशर्त माघार घेतली आहे. आता उमेश पाटील माघार घेणार का? असा प्रश्न पडला आहे.
Jalgaon Crime : ‘आमचा मुलगा सापडत नाहीये हो…’; आई-बापाची तक्रार, शेजाऱ्याच्या बंद घरात पाहिलं असता, काळजात धस्स करणारं दृश्य…
प्राथमिक माहितीनुसार जगतापवर गुन्हे दाखल
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा माढा तालुका युवक अध्यक्ष बाबाराजे जगताप याचे नाव यापूर्वीही वादग्रस्त घडामोडींमध्ये आले होते. कुर्डू प्रकरणात त्यानेच महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मोबाईलवरून संभाषण घडवून आणलं होतं. त्यावेळी अजित पवार यांनी अधिकाऱ्यांशी धमकीच्या स्वरूपात केलेल्या संभाषणामुळे ते अडचणीत आले होते. जगताप याच्याविरोधात अवैध मुरूम उपसा, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि अधिकाऱ्यांना धमकावणे, अशा प्रकारचे गुन्हेही दाखल झाले आहेत.

