मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांचं मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. या आंदोलनाच्या काळात आझाद मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरातील हॉटेल, खाऊगल्ली बंद आहेत. आंदोलकांना पिण्याचं पाणी मिळण्यासाठीदेखील कष्ट करावे लागत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
“तुम्ही आम्हाला मुंबईत मराठ्यांना असे हाल दिले तर मुख्यमंत्री साहेब इथून मुंबईत गेल्यावर मराठ्याच्या मुलाच्या डोक्यात राहणार आहे की, आपल्याला मुंबईत कशी वागणूक दिली. तुमच्या सुद्धा किंवा तुमच्या नेत्याच्या तिथे सभा झाल्या तर आम्ही तशी वागणूक तिथे देऊ. आमचे लोकं तुम्हाला तिकडे त्रास देणार. लफडा होणारच. लेकरं लांबून आले आहेत, थेंबभर पाणी द्यावं, चटणी-भाकर द्यावेत. मुंबईत आले म्हणून हॉटेल बंद ठेवले. छत्र्या नाहीत”, असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
“जनमताला तुम्हाला किंमत द्यावं लागेल. तुम्हाला एकमताने लोकं काय सांगतात त्याला किंमत द्यावी लागेल. तुमचं खरं आहे, आणि लोकांचं खरं नाही ही कोणती पद्धत आहे? आम्ही तुमचा रस्ता मोकळा केला. तर सरकारने बातमी दिली की, मुंबईच मोकळी करा. मराठ्यांची मुलं रस्त्याने चालत असतील काही त्रास आहे का? मराठ्यांच्या मुलाने कुणाला शिवीगाळ केली का? मराठ्याचं पोरगं काही साप आहे का? गेला असेल, खेड्याचं लेकरु आहे. काही लोकं आल्यानंतर आजूबाजूला बघतात. तुम्ही सुद्धा सभेला आल्यावर बघतातच ना? आधी रेस्ट हाऊसला जाणार, खोलीचा वास घेऊन बघणार. तुमची वेगळी भावना आणि आमची वेगळी भावना?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
“तसं पाहिलं तर माझं तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे. जेव्हा जेवण मिळालं तेव्हा थोडंच जेवण केलं. मराठे दु:ख आणि वेदना घेऊन आले आहेत. ते माज आणि मस्ती घेऊन आलेले नाहीत. आमच्या लेकरांचे खूप हाल आहेत. आमच्या आई-वडिलांचे कष्ट करुन कंबर मोडलं आहे. तुम्ही वेदनेवर लक्ष देत नाहीत म्हणून त्यांना राग येतो. मी उपोषण करुन मेल्यानंतर आरक्षण द्या. पण तेव्हा तरी द्या. फक्त इथले दुकानं बंद करु नका. नाहीतर तुमच्यादेखील महाराष्ट्रातील सभेवेळी तेच होईल. तुमच्या सभेवेळी तुमच्या गेस्ट हाऊसच्या दिशेला जाणारी पाईपलाईन तेवढ्या दिवसापर्यंत बंद करणार”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

