CBI Big Action on Call Centre : नाशिकमध्ये सीबीआयने मोठी कारवाई केली. एका बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. ऑनलाईन फसवणूकीप्रकरणी सीबीआयने धाड टाकली. कोटींची रोख रक्कम, सोने आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. सात आलिशान गाड्याही ताब्यात घेतल्या आहेत. या प्रकरणी सहा जणांना अटक झाली असून, अधिक तपास सुरू आहे.
सीबीआय या कारवाईसंदर्भातील प्रेस रिलीज जारी केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, ८ ऑगस्टला सायबर फसवणुकीविपरोधात मोठी कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये ६ आरोपींसह काही अज्ञात व्यक्ती आणि बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याविरोधात एफआयआर नमूद करण्यात आली होती. ज्यामध्ये आरोप करण्यात आला आहे की, आरोपींनी काही अज्ञात व्यक्तींच्या संगनमताने लोकांची फसवणूक करण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी अमेजन सपोर्ट सर्विसेस नावाने एक बोग कॉल सेंटर बनवला. यामार्फत त्यांनी फिशिंग कॉल आणि दिशाभूल करणारे कॉल करून लोकांची मोठी आर्थिक फसवणूक केली .
Nanded Crime : कारच्या डिक्कीमधून रक्त, पोलिसांनी विचारताच पळ काढला, पाठलाग करताना पोलिसांची गाडी पलटी; नांदेडमध्ये खळबळ
या बोगस कॉल सेंटर मार्फत अमेरिका, कॅनडा आणि अन्य देशांतील लोकांची मोठा गंडा घालण्यात आला. आरोपींनी त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड्स एवढेच नाहीतर क्रिप्टोकरेंसी नावाखाली अवैध पैसे देखील उकळले. हे संपू्र्ण रॅकेट चालवण्यासाठी त्यांनी ६० ऑपरेटर्संना कंपनीत भरती केले होते. ज्यामध्ये डायलर, व्हेरिफायर आणि क्लोजर अशा कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
सीबीआयने या कॉल सेंटरवर धाड टाकली. यामध्ये अधिकाऱ्यांनी छाप्यात ४४ लॅपटॉप , ७१ मोबाईल फोन, १.२० कोटी रुपये रोख, ५०० ग्रॅम सोने आणि १ कोटी रुपये किमतीच्या ७ लक्झरी कार जप्त करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर ५ हजार USDT क्रिप्टोकरन्सी (५ लाख रुपये) आणि २००० कॅनेडियन डॉलर गिफ्ट व्हाउचर (१.२६ लाख रुपये) चे अवैध व्यवहार आढळून आले आहेत. हे संपूर्ण घबाड हाती लागल्याने मोठे सायबर फसवणुकीचे रॅकेट सर्वांसमोर आले आहे.

