Nishikant Dubey On Raj Thackeray Marathi Row : अमराठी व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर मनसे आक्रमक झाली होती. राज ठाकरे यांनी मिरा भाईंदर येथील सभेत भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘मुंबईत येऊन दाखवा, समुद्रात बुडवून मारू’, असं आव्हान त्यांनी दुबेंना दिलं. विधानभवनातील राड्यावरुन भविष्यात गंभीर घटना घडू शकतात, अशी भीतीही राज ठाकरेंनी व्यक्त केली.
राज ठाकरे काय म्हणाले?
मराठी आणि महाराष्ट्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांनाही राज ठाकरे यांनी लक्ष्य केले. ‘दुबे, तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, तुम्हाला मुंबईच्या समुद्रात डुबवून मारू’, असे राज म्हणाले. महाराष्ट्रात येऊन कोणीही मराठी व्यक्तीच्या अंगावर आला तर त्याला ठेचायचे. आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही, असं म्हणत राज ठाकरे यांनी दुबे यांच्यावर निशाणा साधला. दुबे यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा व्हिडीओ त्यांनी ट्विट करत, मी राज ठाकरेंना हिंदी शिकवली? असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. राज यांनी हिंदीमध्ये दुबेंना प्रत्युत्तर दिलं होतं. त्याचाच धागा पकडत दुबेंनी ठाकरेंना डिवचलं. आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठाकरेंनी विधानभवनाच्या सभागृहात झालेल्या राड्यावर ही भाष्य केलं.
मैंने राज ठाकरे को हिंदी सिखा दी ? https://t.co/5YpM1SrzDt
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) July 18, 2025
तू मुंबईत येऊन दाखव, समंदर में…; भाजप खासदार निशिकांत दुबेला राज ठाकरेंचं आव्हान
‘…तर भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडतील’
महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबीत आहेत, राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, कंत्राटदारांची देणी रखडली आहेत, जिल्ह्यांना विकास निधी मिळत नाही. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि मंत्रीच प्रश्न विचारत आहेत की अधिवेशन ही औपचारिकता उरली आहे का? या सगळ्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून या उथळ गोष्टी घडू दिल्या जात आहेत? आज अशा लोकांना जर माफ केले तर यापुढे हे प्रमाण मानून भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, असं म्हणत ठाकरेंनी खंत व्यक्त केली.

