लातूर जिल्ह्यातील कोळपा येथे बौद्ध विहाराच्या जागेत झेंडा रोवताना विजेचा धक्का लागून दोन मित्रांचा मृत्यू झाला. अंकुश कांबळे आणि सूरज गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले.
दोघांचा जागीच मृत्यू, तर दोघेजण गंभीर जखमी
सदरील घटनेमध्ये अंकुश कांबळे व सूरज गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर गोपाळ झोडपे व अजित जाधव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. खड्डा खणून झाल्यानंतर उभा करत असलेल्या लोखंडी पाईप वरून जाणाऱ्या एकरा किलोव्हॅटच्या तारांना चिकटला आणि यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने दोघांचा जागेस मृत्यू झाल्याचे समजते. अन्य दोघांना लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वाऱ्यासारखी पसरली. यामुळे सर्वत्र व्यक्त हळहळ करण्यात येते आहे. दोघांच्या मित्रांनी व्हॉट्स ऍपवर स्टेटस ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
नायगावमध्ये शॉक लागून शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू
दुसरीकडे नायगावच्या बीच कॉम्प्लेक्समध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळत असताना विजेचा शॉक लागून आकाश साहू या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तो इयत्ता दहावीत शिकत होता. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. आकाशच्या अकाली निधनानं साहू कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास आकाश त्याच्या मित्रांसोबत सोसायटीच्या आवारात बॅटमिंटन खेळत होता. खेळताना शटल कॉक पहिल्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटवरील खिडकीत गेला. तो शटल काढण्यासाठी आकाश वर गेला असता, तिथल्या खिडकीतून एसीच्या विद्युत प्रवाहाचा जोरदार शॉक लागून आकाश जागीच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

