mumbai metro 3 Siddhivinayak Station : मेट्रो ३ आता सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पोहोचली आहे. आरे ते वरळी नाका हा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत होणार आहे. या मार्गावर एकूण १६ स्थानके आहेत. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा दुसरा टप्पा नुकताच सुरू झाला. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.
देशातील सर्वाधिक लांबीच्या आणि राज्यातील १०० टक्के भुयारी असलेल्या मेट्रो ३ चा बीकेसी ते आचार्य अत्रे चौक हा पुढील टप्पा शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू झाला. या दोघांसह मार्गिका उभी करणाऱ्या कंपनीचे पदाधिकारी, अन्य कर्मचारी यांनी बीकेसी ते सिद्धिविनायक मंदिर स्थानक, असा या गाडीतून प्रवास केला.
Coastal Road : नरिमन पॉइंट ते दहिसर प्रवास सुस्साट, १८ मार्गिका वाहन चालकांच्या सेवेत येणार; कुठून, कसा असेल मार्ग?
या मार्गिकेचा आरे जेव्हीएलआर ते बीकेसी हा पहिला टप्पा ७ ऑक्टोबर २०२४ रोजी कार्यान्वित झाला आहे. शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंत (वरळी नाका) ही मार्गिका सुरू झाली. यामुळे प्रवाशांच्या वेळेची आणि पैशांचीही बचत होणार आहे. या मार्गिकेवर सध्या आरे जेव्हीएलआर ते बीकेसी ही १० स्थानके आणि १२.६९ किमीचे तिकीट ५० रुपये आहे.
गगनयान मोहिमेच्या ग्रुपचे कॅप्टन अजित कृष्णन यांना परत बोलावलं, India-Pakistan Tension दरम्यान मोठा निर्णय
बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, अशी सहा स्थानके आणि ९.९९ किमी अंतरासाठीचे तिकीट ४० रुपये असेल. मात्र आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक स्थानक, अशा पूर्ण प्रवासासाठी ६० रुपयेच दर असेल.
Mumbai Metro 3 : दीड तासाचा प्रवास आता १५ मिनिटांवर, भुयारी मेट्रो ३ सिद्धिविनायक मंदिरामार्गे मुंबईत; काय आहेत तिकीट दर?
नव्या टप्प्यासह स्थानकांचे तिकीटदर (रु.)
(आरे जेव्हीएलआर-आचार्य अत्रे चौक)
सीप्झ – १०
एमआयडीसी अंधेरी – २०
मरोळ नाका – २०
विमानतळ टी २- ३०
सहार रोड – ३०
विमानतळ टी १ – ३०
सांताक्रुझ – ४०
वांद्रे वसाहत – ४०
बीकेसी – ५०
धारावी – ५०
शीतलादेवी मंदिर – ५०
दादर – ५०
सिद्धिविनायक मंदिर – ६०
वरळी – ६०
आचार्य अत्रे चौक – ६०

