संतोष देशमुख प्रकरणात मनोज जरांगे यांनी खळबळजनक दावा केलाय. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून डाव साधल्याचा त्यांचा आरोप आहे. देशमुख कुटुंब व फडणवीसांनी ठरवून सहआरोपी थांबवले असा त्यांनी दावा केला. जेव्हा देशमुख कुटुंबाला गरज पडेल तेव्हा मी सोबत असेन असेही जरांगे म्हणाले. तर आरक्षणाच्या मुद्यावरून त्यांनी छगन भुजबळांवरही पुन्हा निशाणा साधला.