• Mon. Nov 25th, 2024
    भरधाव टेम्पोने तीन महिलांना चिरडलं, भीषण अपघातात दोन जैन साध्वींचा अंत

    रायगड : कर्जत – नेरळ मार्गावर यापूर्वी अनेकदा अपघात घडले आहेत. अनेकांना या मार्गावर झालेल्या अपघातात आपला जीवही जमवावा लागला आहे. आता असाच एक मोठा भीषण अपघात या मार्गावर झाला आहे भरधाव आलेल्या टेम्पोने तीन जणांचा जीव घेतला आहे. कर्जत – नेरळच्या दिशेने पायी जाणाऱ्या जैन साध्वीसह सेवेकरी महिलांना एका वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात जैन साध्वी मौलिक पुराणश्रीजी आणि सेवेकरी लता ओसवाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य एक सेवेकरी जखमी झाली आहे.काल १९ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास जैन साध्वी मौलिक पुराणश्रीजी आणि इतर सेवेकरी असे १२ जणी कर्जतवरून नेरळकडे पायी चालल्या होत्या. त्यावेळी नेरळकडून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या एका दूध वाहून नेणाऱ्या टेम्पोने त्यांना मागून जबरदस्त धडक दिली. यात साध्वी मौलिक पुराणश्रीजी व लता संदीप ओसवाल यांचा मृत्यू झाला. तर दीपाली संजय ओसवाल या गंभीर जखमी असून त्यांच्यावर पनवेल येथील गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत असून या अपघातामुळे जैन समाज बांधवांमध्ये शोककळा पसरली आहे.
    मराठा समाजातील बंधू,भगिनींनी जागरूक रहावे; १० टक्के आरक्षण दिल्यानंतर राज ठाकरे असं का म्हणाले?
    घटनेनंतर जैन समाजाने कर्जत, नेरळ, खोपोली भागातील आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कर्जत पोलिसांनी तात्काळ आरोपी व अपघात करणाऱ्या टेम्पोचा सीसीटीव्हीच्या मदतीने शोध घेऊन त्याला तळोजा येथून ताब्यात घेतले असल्याचे समजते. अपघात करून पळ काढणाऱ्या टेम्पो चालकाचे नाव रविशंकर सेन (वय ४०) असे असून हे वाहन तुर्भे येथील असल्याची माहिती मिळत आहे. अधिक तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करत आहेत. तर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जैन समाजाला शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *