Sakinaka Manhole Accident: या आठवड्यात कंत्राटदाराला पुन्हा नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतरही उत्तर न मिळाल्यास कंत्राटदाराला ‘काळ्या यादी’त टाकण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
अश्विनी भिडेंचा आदेश, पण ७ दिवसांनंतरही कारवाई नाही; मॅनहोल दुर्घटनेतील कंत्राटदाराची बेपर्वाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशांत मोरे, मुंबई : कुर्ला साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये (मनुष्य प्रवेशिका) पडून एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना २ जुलैला घडली होती. यानंतर संबंधित कंत्राटदाराला ‘काळ्या यादी’त टाकण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले होते. त्याच दिवशी कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावण्यात आली. मात्र सात दिवसांनंतरही कंत्राटदाराने त्यावर उत्तर दिलेले नाही. त्यामुळे कंत्राटदाराला ‘काळ्या यादी’त टाकण्याची प्रक्रियाच रखडली आहे.
मुंबई महापालिकेच्या एल वॉर्डमधील कुर्ला साकीनाका खैरानी रोड परिसरात मलनिस्सारण प्रचालन विभागांतर्गंत एका मॅनहोलवर संरक्षक जाळी बसवण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी रस्त्यावरून असलम इसाक शेख हे मोबाइलवर बोलत पायी जात होते. शेख मॅनहोलजवळ आले, त्यावेळी मॅनहोलजवळ कामासाठी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांना आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेख यांचा तोल जाऊन ते मॅनहोलमध्ये पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एल वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांसह चौघांचे निलंबन केले आहे. सुरक्षेत हलगर्जी करणाऱ्या संबंधित कंत्राटदारास ‘काळ्या यादी’त टाकण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. मात्र अद्याप कारवाई झालेली नाही.
घटनेदिवशी मुंबई महापालिकेच्या एल वॉर्डकडून कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला कंत्राटदाराकडून उत्तर मिळाल्यानंतर त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येणार होती. यासाठी कंत्राटदाराला सात दिवसांची मुदतही देण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने या ‘कारणे दाखवा’ नोटिशीकडे सपशेल पाठ फिरवली आहे, कंत्राटदाराने नोटिशीला उत्तरच दिलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘नाल्यांवर ट्रॅश बूम बसवा’
‘मुंबईत पावसाळ्यात नाले आणि नद्यांमधून समुद्रात वाहून जाणारा कचरा रोखण्यासाठी सर्व नाले व नद्यांच्या मुखाशी ट्रॅश बूम उभारावेत आणि तेथे अडविण्यात आलेला कचरा उचलण्यासाठी वर्षभर २४ तास कार्यरत यंत्रणा उभारावी,’ अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर रितू तावडे व महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा