• Thu. Jul 2nd, 2026
    Ram Kadam On Raj Thackeray: राज ठाकरेंवर हक्कभंग येऊ शकतो; राम कदमांचा इशारा, फोडाफोडीचं राजकारण तापलं

    Ram Kadam On Raj Thackeray: राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावरून मनसेप्रमख राज ठाकरे यांनी टीका केली होती. एका पक्षातून फुटून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आमदार-खासदारांनाही त्यांनी यावेळी लक्ष्य केले.

    राम कदम राज ठाकरे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देहविक्री असा उल्लेख करीत भाजपला लक्ष्य केल्यानंतर याबाबत राज ठाकरे यांच्यावर हक्कभंग कारवाई होऊ शकते, असा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिला.

    महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे ते घाणेरडे आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाहीत तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहेत. हे देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईकं तयार आहेतच, अशी वादग्रस्त टीका राज ठाकरे यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर राम कदम यांनी हा इशारा दिला.

    Maharashtra TimesSachin Ahir: विरोधकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन! उपसभापतिपदी बिनविरोध निवडीनंतर सचिन अहिर यांची ग्वाही
    राज ठाकरे यांचे विधान आहे, त्यात हक्कभंग होऊ शकतो, त्यांचे विधान विशेषाधिकाराचे हनन करणारे आहे. मनात त्यांच्याबद्दल आदर आहे, मी हक्कभंग टाकणार नाही, मात्र विधान तसे आहे, असे कदम म्हणाले. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा छळ केला म्हणून त्यांनी पक्ष सोडला, असे कदम म्हणाले.

    … तर पक्षांतर करणारे हरले असते
    लोकांना रोष वाटला असता तर पक्षांतर करणारे हरले असते. २०-२० लाख लोकांमधून निवडून येणारे लोकप्रतिनिधी पक्ष बदलतात याचे काही कारण असेल की नसेल, एखादा कॅबिनेट मंत्री सत्ता सोडून गेला असे कुठे झाले आहे का कधी, एकनाथ शिंदेंसोबत गेले होते ते परत निवडून आले आहेत ना. लोकांना रोष वाटला असता तर ते हरले असते, असेही कदम यांनी नमूद केले.

    एकेक आमदार फुटणार, आदित्य ठाकरे शिंदेसेनेत जाणार? आमदार सईद खान यांचं विधान

    पक्षफोडीचे राजकारण अत्यंत चिंताजनक – राज ठाकरे
    महाराष्ट्रासह देशात सध्या सुरू असलेले पक्षफोडीचे राजकारण अत्यंत चिंताजनक आहे. विरोधी पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न हा लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारा आहे. सत्ता कायमस्वरूपी कोणाकडेच राहत नाही, त्यामुळे सध्या निर्माण होत असलेली राजकीय पद्धत भविष्यात सत्ताधाऱ्यांना महागात पडू शकते’, अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा