• Thu. Jun 18th, 2026

    आशाताईंच्या जाण्याने भारतीय संगीताचा अमूल्य ठेवा हरपला – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Apr 12, 2026
    आशाताईंच्या जाण्याने भारतीय संगीताचा अमूल्य ठेवा हरपला – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद

    मुंबई, दि. १२ : पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे, असे मला मनापासून वाटते. या शब्दात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

    त्यांनी आपल्या सुरेल, बहुआयामी आणि वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने अनेक दशकं संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवलं. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन त्यांनी संगीतप्रेमींच्या मनावर अढळ स्थान निर्माण केले. प्रत्येक गाण्यातून त्यांनी अनोखा ठसा उमटवला.

    आशाताई भोसले या केवळ गायिका नव्हत्या, तर त्या भारतीय संगीत परंपरेचा एक जिवंत वारसा होत्या. त्यांच्या गायकीतील विविधता, ऊर्जा आणि भावस्पर्शी सादरीकरण हे येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील. अशा महान कलाकार पुन्हा होणे कठीण आहे.

    त्यांच्या निधनामुळे संगीतविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा अमर आवाज आणि त्यांनी दिलेल्या असंख्य कलाकृती युगानुयुगे रसिकांच्या स्मरणात राहतील, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत, या दुःखद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून, ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच प्रार्थना.! या शब्दात कृषिमंत्री यांनी भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त केली आहे.

    ******

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed