• Mon. Jun 15th, 2026
    Train Ticket Refund New Rules: रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमांत बदल; कन्फर्म तिकीट रद्द केल्यास किती रिफंड मिळणार? जाणून घ्या

    Railway Ticket Cancellation Rule Change: उशिरा तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना अधिक आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास रद्द करण्याचा निर्णय वेळेत घेणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

    रेल्वेचे तिकीट रद्द कडक नियम लागू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे: प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने कन्फर्म तिकिटांच्या रद्द करण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत. नव्या नियमांनुसार आठ तासांपेक्षा कमी वेळ असताना तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही; तसेच तिकीट रद्द करण्याची वेळ लक्षात घेऊन इतर वेळची परताव्याची रक्कम ठरवली जाणार आहे.

    रेल्वे प्रशासनाने तिकिटाचा चार्ट तयार करण्याच्या वेळात बदल केले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तिकीट रद्द केल्यानंतर नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना कायम गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांकडून अगोदरच तिकीट बुकिंग करून ठेवले जाते. त्यामुळे प्रवासी दोन महिने आधी तिकिट बुक करू शकतात, असा नियम केला आहे. प्रवाशांनी आगाऊ तिकीट बुक केल्यानंतर अचानक काम निघाल्यामुळे तिकीट रद्द केले जाते. यातून रेल्वे प्रशासनाना दर वर्षी कोट्यवधी रुपये मिळतात. रेल्वेच्या नवीन नियमांनुसार आता प्रवाशांनी तिकीट ७२ तासांपेक्षा आधी रद्द केल्यास फक्त किमान तिकीट रद्द शुल्क (कॅन्सलेशन) आकारले जाईल आणि उर्वरित रक्कम परत मिळेल.

    Maharashtra TimesPune Crime: पुण्यात ACBची मोठी कारवाई; 2 लाखांची लाच घेताना प्रांताधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं, महसूल विभागात खळबळ
    रेल्वे प्रशासनाने हे बदल करताना चार्ट तयार होण्याच्या वेळेत झालेल्या बदलाचा आधार घेतला आहे. यापूर्वी चार्ट चार तास आधी तयार होत होता. मात्र, आता तो नऊ ते १८ तास आधी तयार केला जातो. त्यामुळे जुन्या ४८/१२/४ तासांच्या नियमांऐवजी ७२/२४/८ तासांची नवीन रचना लागू करण्यात आली आहे. अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत तिकिटे ब्लॉक करून ठेवली जात असल्याने खऱ्या प्रवाशांना तिकिटे मिळण्यात अडचणी येत होत्या. नव्या नियमांमुळे याला आळा बसून, तिकिटांची उपलब्धता वाढण्याची अपेक्षा आहे. या नव्या धोरणामुळे तिकीट व्यवस्थापन अधिक पारदर्शक व शिस्तबद्ध होणार असून, प्रवाशांना योग्य नियोजन करून प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

    ‘बोर्डिंग पॉइंट’ बदलता येणार
    अनेकदा प्रवाशांना शेवटच्या क्षणी आपला प्रवासाचा मार्ग बदलावा लागतो; पण रेल्वेच्या नियमानुसार तो बदलता येत नव्हता. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत होता. रेल्वे प्रशासनाने ही गोष्ट लक्षात घेऊन आता प्रवासी ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटे आधीपर्यंत आपला ‘बोर्डिंग पॉइंट’ डिजिटल पद्धतीने बदलण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा विशेषतः मोठ्या शहरात जिथे अनेक स्थानके आहेत तिथे प्रवाशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

    Maharashtra TimesPune Crime: महादेवाचा अवतार असल्याचं सांगून पुण्यातील महिलेवर लॉजमध्ये अत्याचार; स्वयंघोषित धर्मगुरूला अखेर अटक
    ‘तिकीट रद्द’चा नवीन नियम
    ७२ तास आधी : फक्त रद्द तिकिटाचे शुल्क आकारले जाणार
    ७२ ते २४ तास : तिकिटातील २५ टक्के रक्कम कपात
    २४ ते आठ तास : तिकिटातील ५० टक्के रक्कम कपात
    आठ तासांपेक्षा कमी वेळ : कोणताही परतावा मिळणार नाही

    रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या नव्या जाचक नियमांना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा तीव्र विरोध आहे. रद्द केलेली जागा रेल्वे पुन्हा पूर्ण दराने विकते. मग ग्राहकांचे पैसे का जप्त केले जातात ? –सूर्यकांत पाठक, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय ग्राहक पंचायत

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा