Metro Cement Pillar Collapse on Rickshaw in Mulund : मुलुंड येथे मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सिमेंटच्या पिलरचा भाग रिक्षावर कोसळला.
नेमकं काय घडलं?
मुलुंड येथे मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी सिमेंटच्या पिलरचा भाग कोसळला. शनिवार १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मुलुंड पश्चिम भागातील लाल बहादूर शास्त्री रोडवर जॉनसन अँड जॉनसन कंपनीच्या जवळ मुंबई मेट्रोचे बांधकाम सुरु असताना हा प्रकार घडला.
कसा झाला अपघात?
एलबीएस मेट्रो स्थानकाच्या बांधकामादरम्यान सिमेंटच्या खांबाचा एक भाग कोसळून खालून जाणाऱ्या रिक्षावर पडला. यावेळी रिक्षातून प्रवास करणारे चालकासह तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दल, पोलिस, मेट्रो कर्मचारी, वॉर्ड कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.
Eknath Shinde | ड्रग्स फ्री आणि प्रदूषणमुक्त मुंबई करण्यासाठी प्रयत्न करणार, शिंदेंची घोषणा
रिक्षा पिलरखाली दबल्यामुळे एक जण काही काळ अडकून पडला होता. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने स्लॅब हटवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाल्याचं पाहायला मिळालं.
Hoskote Accident : तुमच्या मुलांच्या बॉडीची ओळख पटवून जा… काळजाला भोकं पाडणारा पोलिसांचा फोन, अनभिज्ञ आई-बाप हादरले, सहा मित्रांचा दुर्दैवी अंत
मेट्रो मार्ग चारवर अपघात
मुंबई मेट्रो 4 या वडाळा-घाटकोपर-मुलुंड-कासारवडवली मार्गे जाणाऱ्या ग्रीन लाइनवरील स्टेशनच्या बांधकामावेळी हा अपघात झाला आहे. 32.32 किमीचा एलिवेटेड कॉरिडोअर मुलुंडसह भांडुप, कांजुरमार्ग या एलबीएस रोडवरील स्थानकांची कनेक्टिव्हिटी वाढवत मुंबईतील महत्वपूर्ण व्यावसायिक भागांशी जोडेल. यामुळे मुंबई लोकलवरील ताण कमी होणार आहे. तसेच प्रवासाचा वेळ ६०-७५ मिनिटांवरून ३०-४० मिनिटांपर्यंत कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
Virendra Sinha Pune : आय लव्ह यू रिया, कुठल्या तरी जन्मात पुन्हा भेटू; शेवटचा मेसेज केला, पुण्यातील IT कर्मचाऱ्याने लोणावळ्यात आयुष्य संपवलं
