Mayors salary and allowance: महापौरांना किती मानधन मिळतं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या….
मुंबई महापालिका
दरम्यान, आज आपण मुंबई या मोठ्या महापालिकेबद्दल उदाहरणाखातरं जाणून घेऊयात. तर मुंबई ही आशियातील सर्वातं मोठी आणि श्रीमंत महापालिका आहे. मुंबई महापालिकेचे वार्षिक बजेट 75,000 कोटींहून अधिक आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या आणि अवाढव्य अशा महापालिकेवर नियंत्रण ठेवणाऱ्या मुंबईच्या महापौरपदाची प्रतिष्ठा जितकी आहे तितकेच मोठे वेतन दिले जाते असा समज होऊ शकतो, मात्र तसं काही नाही आहे.
किती मिळते मानधन?
हो तुम्ही महापौरपदावर बसणाऱ्या व्यक्तीचं मानधन वाचून अंचबित व्हाल पण हे खरं आहे. मंडळी मुंबईच्या महापौराला मूळ मासिक मानधन हे 7,500 रुपये दिलं जातं. महापौर हादेखील नगरसेवकातूनच निवडून गेलेला असतो त्यामुळे त्याला त्याचेही मानधन आणि टेलीफोन भत्ते, पाहुणचारासाठीचा भत्ता, आतिथी भत्ता आणि प्रवास भत्ता इत्यादी भत्ते मिळून महापौराची एकूण मासिक उत्पन्न 50 ते 55 हजार रुपयांपर्यंत जाते.
जर वार्षिक उत्पन्नाबद्दल सांगायचे झाल्यास वर्षाकाठी 6 ते साडे 6 लाख एवढे मानधन महापौराला मिळते. दरम्यान, महापौरपदासाठी कोणतीही वेतन क्षेणी नसल्याने महापौरांना वार्षिक पगारवाढ मिळत नाही.
Mumbai MHADA Lottery : स्वप्नाच्या शहरात स्वत:चं घर! मुंबईत 120 फ्लॅटची लॉटरी, म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देणार; कसा करायचा अर्ज?
उच्च दर्जाच्या सुविधा
मंडळी महापौरांना मिळणाऱ्या मानधनाचा आकडा तुम्हाला लहान वाटत असला तरीही शहराचा तो प्रथम नागरीक असतो. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा या अत्यंत खास आणि तितक्याचं आलिशान असतात. यामध्ये त्यांना शासकीय निवासस्थान दिले जाते. मुंबई, पुणे आणि मोठ्या महापालिकांनी भव्य बंगले त्यासाठी निर्माण केलेले आहेत. याशिवाय त्यांना विशेष वाहने आणि ताफाही मिळतो.
ज्यामध्ये लाल दिवा असलेली शासकीय गाडी आणि त्याबरोबर वाहनचालकही दिला जातो. फक्त एवढंच नाही तर विशेष कर्मचारी आणि मदतनीसही दिले जातात. जे त्यांना दैनंदिन कामकाजासाठी कार्यलय आणि निवासस्थानी मदत करतात.
दौरे, बैठका, परदेशी पाहुणे यांच्याशी गाठीभेटींसाठी आणि स्वागतासाठी होणारा सर्व खर्च महापालिका करते. त्यामुळे वरील सर्व सोयी सुविधांचा विचार केला तर कोणत्याही महापालिकेच्या महापौराचा पगार कमी वाटत असला तरी त्यांचा थाट मात्र हा एखाद्या कॅबिनेट मंत्र्यासारख्याच असतो.
