• Sat. Jul 4th, 2026

    विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित पुढील अधिवेशन ८ डिसेंबर रोजी नागपुरात – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jul 18, 2025
    विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित पुढील अधिवेशन ८ डिसेंबर रोजी नागपुरात – महासंवाद




    मुंबई, दि. १८ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

    विधानसभेत प्रत्यक्षात १३३ तास कामकाज

    विधानसभेत प्रत्यक्षात १३३ तास ४८ मिनिट कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ८ तास ५५ मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९०.२० टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ८२.२३ टक्के इतकी होती.

    विधानसभेत पुर्न:स्थापित १४ शासकीय विधेयके मांडण्यात आली. तसेच सभागृहात नियम २९३ अन्वये एकूण प्राप्त सूचना ५ असून ५ सूचना मान्य करण्यात आल्या. मान्य केलेल्या सूचनांवर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

    0000

     

    शैलजा पाटिल/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed