• Sat. Mar 7th, 2026

    Gaurav Ahuja : पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाचा माज उतरला; जाहीर माफीचा व्हिडीओ समोर

    Gaurav Ahuja : पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाचा माज उतरला; जाहीर माफीचा व्हिडीओ समोर

    Gaurav Ahuja Apologized :पुण्यात भर चौकात महिलांसमोर अश्लील चाळे करणारा विकृत गौरव अहुजा हा अखेर पोलिसांना सापडला आहे. गौरव अहुजा याने आपल्या कृत्यानंतर माफी मागितली आहे. त्याच्या माफी मागतानाचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणारा गौरव अहुजा याचा अखेर माज उतरला आहे. पोलीस आज सकाळपासून त्याचा शोध घेत होते. अखेर तो पोलिसांच्या हाती लागला आहे. पोलिसांनी आरोपी गौरव अहुजा याला अटक केली आहे. यानंतर गौरव अहुजा याच्या माफी मागतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. गौरव अहुजा पुण्यातून बाहेर पळून गेला होता. पण पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतलं आहे. त्याला लवकर जवळच्या पोलीस ठाण्यात हजर केलं जाईल. त्यानंतर त्याला पुण्याला नेण्यात येईल. त्यानंतर त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे.

    गौरव अहुजा माफी मागताना काय म्हणाला?

    “मी गौरव अहुजा. राहणार पुणे. माझ्याकडून काल पब्लिकमध्ये जे कृत्य झालं होतं ते खूप चुकीचं होतं. मी मनापासून माफी मागतो. मी संपूर्ण जनता, पोलीस आणि शिंदे साहेबांची माफी मागतो. मला माफ करा आणि मला एक संधी द्या. सॉरी”, असं गौरव अहुजा व्हिडीओत बोलताना दिसत आहे. ‘एबीपी माझा’ने गौरव अहुजाचा माफी मागतानाचा व्हिडीओ समोर आणला आहे.

    गौरव अहुजाचं याआधीही गुन्हेगारी कृत्य

    गौरव अहुजा याने केलेल्या अश्लील कृत्यामुळे पुण्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे आता गौरव अहुजा याची कुंडलीच समोर येत आहे. या गौरव अहुजाने याआधीही जेलवारी केल्याची माहिती समोर येत आहे. गौरव अहुजावर जुगाराचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल आहे. पुण्यातील नामचीन गुंड सचिन पोटो याच्यासोबत हा गौरव अहुजा काम करतो. सचिन पोटे, गौरव अहुजा, सुनील मखेजा आणि अजय शिंदे यांना 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. या चौघांनी एक रॅकेट चालवलं होतं.
    Pune : पुण्यात वातावरण तापलं, अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव अहुजाच्या वडिलांच्या हॉटेलमध्ये महिलांची धडक
    आरोपी क्रिकेट सामन्यांचे बेटिंग करायचे. यामध्ये ते तरुणांना अडकवायचे. यातून त्यांनी अनेक तरुणांना कर्जबाजारी केलं होतं. त्यानंतर या आरोपींनी तरुणांना आपल्या स्वत:च्या घरात पैसे चुकवण्यासाठी चोरी करायला भाग पाडलं होतं. कॉलेजमधील एक विद्यार्थी तक्रारीसाठी पुढे आला आणि त्याचा प्रकार समोर आला होता. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed