• Thu. Mar 19th, 2026
    आदित्य ठाकरेंचा निकटवर्तीय तुरुंगातून सुटताच मातोश्रीवर; गळाभेटीनंतर दोघेही भावूक

    खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर ठाकरेंच्या युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी थेट मातोश्री गाठली आहे. सूरज चव्हाण यांची गळाभेट घेताना आदित्य ठाकरे भावुक झालेले दिसले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर ठाकरेंच्या युवासेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी थेट मातोश्री गाठली आहे. सूरज चव्हाण यांची गळाभेट घेताना आदित्य ठाकरे भावुक झालेले दिसले. दोघांची भेट पाहून आदित्य ठाकरेंच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांना गहिवरुन आलं. त्या मातोश्रीच्या दारातून दोघांची गळाभेट पाहात होत्या. जानेवारी २०२४ मध्ये सूरज चव्हाण यांना अटक झाली होती.

    लॉकडाऊन काळातील खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण यांना अटक झाली होती. १७ जानेवारी २०२४ पासून ते तुरुंगात होते. चव्हाण यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी आरोप केले होते. महानगरपालिकेकडून खिचडीचं कंत्राट घेतल्यानंतर पॅकेटमध्ये ठरल्यापेक्षा कमी खिचडी दिल्याचा आरोप सोमय्यांनी चव्हाण यांच्यावर केला होता. मुंबई उच्च न्यायालयानं आज त्यांना जामीन मंजूर केला.

    सूरज चव्हाण तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आदित्य ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचले. त्यावेळी शिवसेना भवनात आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद सुरु होती. सूरज चव्हाण आल्याचं ठाकरेंनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. ते चव्हाण यांच्या भेटीसाठी पोहोचले. कारमधून उतरलेल्या चव्हाण यांची त्यांना गळाभेट घेतली. त्यावेळी आदित्य ठाकरे भावूक झाले होते.

    यानंतर आदित्य ठाकरेंनी सूरज चव्हाण यांना सोबत मातोश्री गाठली. त्यावेळी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, विधान परिषदेचे आमदार अनिल परब मातोश्रीच्या दारातच होते. युवासेनेचे पदाधिकारीदेखील यावेळी उपस्थित होते. आदित्य ठाकरे सूरज चव्हाण यांना सोबत घेऊन मातोश्रीमध्ये गेले. मागील वर्षभरापासून चव्हाण तुरुंगात होते. अखेर आज त्यांची सुटका झाली.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed